Saturday

स्पेन चे गोविंदा

दरवर्षी स्पेन या देशात सर्वात उंच मानवी मनोरा बनवायची स्पर्धा रंगते .
या स्पर्धेत माणसे ,बायका व लहान मुलेही सहभागी होतात.
त्या स्पर्धेची काही चित्रे काल मला एका मित्राने पाठवली .







हे मानवी मनोरे , लोकांचा उत्साह व उत्सुकता पाहून आपल्या मुंबईच्या गोविंदांची आठवण आल्या शिवाय राहत नाही .
आणि मनात एकाच विचार येतो ... अजून किती दिवस आहेत गोकुळाष्टमीला ??

Funny मराठी SMS collection

FUNNY SMS 1

जेव्हा तुला अगदी एकट वाटेल
नजरे समोर धुक वाटेल
आसपास कोणीच दिसणार नाही
सगळं जग अंधुक होऊन जाईल
तेव्हा तू माझ्या कडे ये
मे तुला
डोळ्यांच्या डॉक्टर कडे घेऊन जाईन

FUNNY SMS 2


लाल पिवळी कोंबडी
तिचे तिचे करडे करडे पाय
बरेच दिवस झाले तुमचा SMS येत नाय
तुम्हाला बर्ड फ्लू झाला की काय..


Sign up for rupeemail and earn rupees to read emails

FUNNY SMS 3


तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करायची आहेत ना...
तर मग...
झोपा आता...
गुड नाइट...

FUNNY SMS 4


भरून आले आसामांत रडू लागले सारे संत...
सार्‍या महाराष्ट्राची एकाच खंत...
आली कुठून ही राखी सावंत...

FUNNY SMS 5

प्रिय
मी फुले मागितली
तू मला पुष्पगुच्छ दिला
मी दगड मागितला
तू मला सुंदर मूर्ती दिलीस
मी मोरपीस मागितली
तू मला मोर दिलास
बहिरी आहेस की काय ?

मनसे ची नवीन मजेदार पाटी -New MNS board


निवडणुकांचे निकाल येऊन खूप दिवस झाले पण अजून सरकार स्थापन झाले नाही....

यावर काही मनसे कार्यकर्त्यांनी हि मजेदार पाटी लावली

Friday

मजेदार मराठी SMS-Funny Marathi SMS

जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस
तसाच १०-१२ एसेमेस फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस


------------ --------- --------- --------- --------- --------- --------- --------- --------- ------
तू झाडावर चढू शकतोस का ?
संजीवनी आणू शकतोस का ?
छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?
नाही ना?

... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.
तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.
एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.
गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.
एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...
... का?

..अंगात मस्ती , दुसरं काय ?
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,
असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?

जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ?
उत्तर : चीनी कम!!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
************ ********* ********* ********* ********* ********* *
तुफान पाऊस पडतोय...
तुला वाटत असेल
छान बाहेर पडावं
भिजून चिंब होत
पाणी उडवत
गाणं गाताना
कुणीतरी खास भेटावं...
हो ना?
अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?
प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!
************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****
ट्रिंग ट्रिंग

हॅलो

हॅलो, प्रकाश आहे का?

नाही.

मग खिडकी उघडा , प्रकाश येईल.
************ ********* ********* ********* ********* ********* ********* *********
Sign up for rupeemail and earn rupees to read emails


********* ********* *****
'' सर, तुम्ही मला शून्य मार्क दिलेत या पेपरात. हे मला बिलकुल मान्य नाहीये,'' ढब्बू ढगोळे तणतणत म्हणाला...
'' अरे, ढब्बू, तुलाच काय, मलाही मान्य नाहीत हे मार्क,'' खंडेराव खत्रूड सर म्हणाले, '' पण, शून्यापेक्षा कमी मार्क देताच येत नाहीत ना रे!!!!''
************ ********* ********* ********* ********* ********* ********* *********
आणि शेवटी ... एक मजेदार पत्र

पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि.
मी पुण्यात होस्टेलवर सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत , तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत.
इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात.
सिग्नलपाशी लाल दिवा असला , तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना.
वळताना हात दाखवायचा , तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही.
हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.
इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत ?
अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका.
पप्पू

Thursday

मास्तरांना हंबीरराव टेंभे - पाटील यांचे मजेदार पत्र -Funny letter

मास्तर !
(हितं तुमचं नाव तुम्ही घाला )
...



मास्तरांना हंबीरराव टेंभे - पाटील यांचे मजेदार पत्र